मुंबई
रत्तनइंडिया एंटरप्रायझेस यांचा समभाग मंगळवारी शेअरबाजारात चांगलाच तेजीत असताना दिसला आहे. मंगळवारी कंपनीच्या समभागाने 20 टक्के तेजी राखत वर्षात उच्चांकी स्तरावर झेप घेण्यात यश प्राप्त केले आहे. समभाग मंगळवारी 77 रुपयांच्या भावावर पोहचला होता. यांची सहकारी कंपनी नीओब्रँडस यांनी हिवाळी उबदार फॅशन कपडे नव्याने बाजारात सादर केले आहेत. या बातमीचा सकारात्मक परिणाम रत्तनइंडिया एंटरप्रायझेस यांच्या समभागावर दिसून आला.









