मुंबई
रत्नवीर प्रीशीसन इंजिनियरिंग यांचा समभाग सोमवारी शेअरबाजारात मजबूतरित्या लिस्ट झाला आहे. 31 टक्के इतका परतावा कंपनीच्या समभागाने गुंतवणूकदारांना दिला आहे. इशु किमत 98 रुपये इतकी असताना कंपनीचा समभाग शेअरबाजारात 128 रुपयांसह लिस्ट झाला होता. सदरचा आयपीओ 94 पट सबस्क्राइब झाला होता. विविध प्रकारच्या उत्पादनांसह डिझाइन कंपनी करते तसेच स्टेनलेस स्टील उत्पादनांची निर्मिती करते.









