रत्नागिरी प्रतिनिधी
कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरीतील एमजी रोड विठ्ठल मंदिरात उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. म़दिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ४ ते १० तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांची आयोजन असल्याचे मंदिर व्य़वसाथापकांकडून सांगण्यात आले आहे.
रत्नागिरीतील एमजी रोड येथील विठ्ठल मंदिर परिसरात कार्तिकी एकादशी निमित्त ठिकठिकाणहून आलेल्या फेरिवाल्यांनी गर्दी केली आहे. शहरातील गाडितळ, राम आळी, मारूती आळी, स्टॅण्ड, पऱ्याची आळी. कॉंग्रेसभवन आदी परिसरात शेकडो फेरिवाल्यानी आपली दुकाने थाटली आहेत. एकादशी यात्रा उद्या सुरू होणार असली तरी या फेरिवाल्यांच्या दुकानात आजपासूनच खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. कार्तिकी एकादशीला रत्नागिरी तालुक्यातील हजारो भाविक भेट देतात.
रात्री २ वाजल्यापासून मंदिरात कार्यक्रम सुरू होणार असून विठ्ठल रखुमाई ची पूजा, त्यानंतर काकडा आरती व नंतर देवदर्शनाला सुरूवात होणार आहे. रत्नागिरी शहरातील या मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आहे.