रत्नागिरी: जिल्हा परिषदेच्या 62 गट आरक्षण सोडतीत आपले राजकीय आरक्षण अबाधित राहण्याकडे डोळे लावून बसलेल्या अनेक इच्छुकांचा बदलेल्या आरक्षणांने हिरमोड झाला आहे. त्यामुळे बदललेल्या गटरचना आणि त्यात आताच्या आरक्षणाने अनेकांचे पत्ते कट होणार आहेत. त्यामुळे केलली मोर्चेबाधणीही फुसकी ठरणार आहे. 31 गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27 टक्केप्रमाणे 16 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाची सोडत शहरातील स्वा. सावरकर नाट्यगृहात गुरूवारी दुपारनंतर पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे आरक्षण निश्चित झाले. उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे,
तेजस्विनी पाटील आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षणाच्या चिठ्ठ्या पुजा पास्टे या मुलीने काढल्या. त्यामध्ये नागरिकांचा मागास वर्गासाठी 27 टक्के प्रमाणे 16 जागा आरक्षित ठेवण्यात
आल्या. त्यातील 8 जागांवर महिलांना संधी मिळाली आहे. हे आरक्षण जाहीर करताना सुरूवातीलाच अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठीआरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये आसगे (लांजा), तर अनूसूचित जातीसाठी
गव्हाणे (लांजा) आणि भडगाव (खेड) यांचे आरक्षण जाहीर झाले. तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी सुकीवली (खेड) थेट आरक्षित झाले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 16 गट आरक्षित करण्यात आले. त्यामध्ये संगमेश्वरमधील कसबा, रत्नागिरीतील करबुडे, झाडगांव म्युनिसिपल हद्दीबाहेर, गुहागरमधील कोंडकारूळ, मंडणगडमधील इस्लामपूर, बाणकोट,
खेडमधील भरणे, राजापूरमधील कातळी हे गट निश्चित झाले. तर ना.मा.प. महिलांसाठी संगमेश्वरमधील कडवई, माभळे, रत्नागिरीतील खालगाव, हातखंबा, खेडशी, मंडणगडमधील भिंगलोळी, दापोलीतील टेटवली, राजापूरमधील साखरीनाटे हे गट निश्चित झाले आहेत.
हेही वाचा- राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीचा वाद आता कोर्टात
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी संगमेश्वरमध्ये धामापूर तर्फे संगमेश्वर,कोसुंब, साडवली, रत्नागिरीमध्ये वाटद, कोतवडे, नाचणे, पावस, राजापूरमध्ये ताम्हाणे, तळवडे, गुहागरमध्ये शृंगारतळी, वेळणेश्वर, पडवे. चिपळूणमध्ये
अलोरे, दापोलीतील केळशी, पालघर, दाभोळ, उसगाव तर खेडमधील विराचीवाडी, लोटे, धामणदेवी हे गट निश्चित झाले आहेत.
सर्वसाधारणसाठी संगमेश्वरमधील कनकाडी, दाभोळे, रत्नागिरीतील कुवारबाव, गोळप, दापोलीतील हर्णे, जालगांव, खेडमधील दयाळ, गुहागरमधील असगोली, चिपळूणमधील शिरळ, पेढे, शिरगांव, सावर्डे, खेर्डी, उमरोली, वहाळ, निवळी, कोकरे, लांजातील भांबेड, साटवली, राजापूरमधील केळवली, कशेळी, जुवाठी हेगट निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे आता इच्छूकांची निवडणूकीच्या मोर्चे बांधणीसाठी धावपळ उडणार आहे.
Previous Article6 फुटी मगर पकडून केली थरारक मोहिम फत्ते…
Next Article अनेक हातांनी घडताहेत उंच गणेशमूर्ती
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.