रत्नागिरी: प्रतिनिधी
शहरातील परटवणे येथील चौकात रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. मासळीची वाहतूक करणारा आयशर ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील अय्यान सईद साखरकर (वय २३ रा. साखरतर) हा तरुण जागीच ठार झाला.
अय्यान सईद साखरकर (वय २३ रा.साखरतर) उद्यमनगर येथून साखरतर येथे निघाला होता तर आयशर ट्रक मिरकरवाडा येथून निघाल होता. परटवणे येथील चौकात या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर साखरतर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघात ग्रस्त आयशर ट्रक चालक व मालकाला जागेवर हजर करा, अशी उपस्थित असलेल्या गर्दीतील लोकांची मागणी करण्यात आली होती.









