रत्नागिरी प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथे जंगलमय भागात 15 फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्याने सईदा रिजवान सय्यद ( 50) राहणार हनुमाननगर, मधलीवाडी या महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. व तिचे प्रेत जंगलमय भागात टाकण्यात आले होते.
मासे विक्री करून आपले पोट भरणाऱ्या महिलेचा खून झाल्याने संगमेश्वर परिसरामध्ये खळबळ उडाली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा व संगमेश्वर पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी जयेश रमेश गमरे (२३) राहणार पिरंदवणे, बौद्धवाडी यास ताब्यात घेतले आहे. या खूनाचा तपास पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, संगमेश्वर पोलीस निरीक्षक झावरे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा व स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तपास करीत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.









