राजापूर वार्ताहर
राजापूर शहरातील समर्थनगर, भटआळी येथील एका २२ वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दीपाली अशोक इंगळे (२२, मूळ कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली.
या पकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली ही पहिल्या वर्षाचे ऑनलाईन शिक्षण घेत होती. १३ नोव्हेंबर रोजी तिचे आई – बाबा दुचाकीवरुन राजापूरातील नातेवाईकांकडे गेले होते. दीपाली ही घरी एकटीच होती. सायंकाळी ते घरी आल्यावर घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी दीपालीला हाका मारल्या. परंतु पतिसाद न मिळाल्याने त्यांनी घराच्या माडीवर जाऊन पाहिले असता त्यांना दीपाली गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. तिला राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.