रत्नागिरी प्रतिनिधी
शहरातील झारणी रोड येथे किरकोळ वादातून लाकडी स्टूल डोक्यात मारल्याने महिला जखमी झाली. नाझिया अरशद होडेकर (40, ऱा झारणी रोड रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आह़े याप्रकरणी नाझिया यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी त्यानुसार संशयित आरोपी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल़ा.
सिराज सुलेमान होडेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाझिया व सिराज हे एकमेकांचे शेजारी राहतात़ 29 जानेवारी रोजी दुपारी 3 च्या सुमारास नाझिया व सिराज यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाल़ा याचा राग मनात ठेवून सिराज याने लाकडी स्टूल नाझिया यांच्या डोक्यात मारल़ा या घटनेत नाझिया यांना दुखातप झाल़ी याप्रकरणी पोलिसांनी सिराज याच्याविरूद्ध भादंवि कलम 324,504,506 नुसार गुन्हा दाखल केल़ा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े









