रत्नागिरी, प्रतिनिधी
शहरातील मारूती मंदिर परिसरात असलेले प्रियंका वाईन मार्ट दुकान चोरट्यांनी फोडून 70 हजार रूपयांची रोकड चोरुन नेली होती. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले दुकान फोडून चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हआयरल झाला आहे.
एक चोरटा शटरचे कुलूप तोडून बिनधास्त दुकानात घुसून गल्यातील रोख रक्कम चोरून तितक्याच सहजपणे दुकानातून निघून जात असल्याचा हा व्हिडिओ आहे.व्हिडिओ डाव्या कोपऱ्यात गुन्हा घडला तो दिवस व वेळही स्पष्ट दिसत आहे.या व्हिडिओची खुमासदार चर्चाही समाज माध्यमावर होताना दिसत आहे. अनेक ग्रुप वर हा मेसेज फॉरवर्ड होत आहे.









