पोलिसांच्या धडक कारवाईत 2 दुचाकीही जप्त
खेड प्रतिनिधी
भरणे येथील साई रिसॉर्टजवळ व्हेल माशाच्या उलटीची विकी करण्यासाठी दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांना येथील पोलिसांच्या पथकाने अटक केली. माशाच्या उलटीसह दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
काही व्यक्ती लुप्तपाय पजातीच्या माशाची उलटीची विकी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनवणे, खवटीचे वनरक्षक रानबा बंबर्गेकर यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने भरणे येथील साई रिसॉर्टजवळ सापळा रचला.
या रिसॉर्ट जवळून तिघेजण दोन दुचाकीवरून संशयितरित्या जाताना पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने तिघांनाही थांबवून झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात असलेल्या एका पिशवीत लुप्तपाय पजातीच्या माशाची उलटी आढळली. या तिघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापकरणात अन्य व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता गृहित धरत पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
या पथकात पोलीस मुख्यालयातील पोलीस काŸन्सटेबल मोरे, येथील पोलीस स्थानकातील पोलीस काŸन्स्टेबल जोगी, माने, जगताप, कोरे यांचा समावेश होता.