रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील साळवी स्टॉप येथे कार-रिक्षा व दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघात झाला . यामध्ये रिक्षा चालक व दुचाकीस्वार जखमी झाले असून रिक्षाचालकाला अपघातात गंभीर दुखापत झाली असल्याच सांगण्यात आले. अपघाताची घटना गुरूवारी रात्री 11.40 च्या सुमारास घडली. यापकरणी कारचालकाविरूद्ध रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षाचालक रियाज अहमद शेगळे (ऱा ट़ि ज़ी शेट्येनगर रत्नागिरी) व दुचाकीस्वार दत्ताराम सदानंद सुर्वे (58, ऱा भाटये जोयनाकवाडी रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत़ याप्रकरणी दत्ताराम सुर्वे यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत कारचालकाविरूद्ध तकार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी कारचालक श्र्वेतांग प्रदीप वायंगणकर (ऱा खेडशी गयाळवाडी, रत्नागिरी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ताराम सुर्वे हे गुरूवारी रात्री ज़े के फाईल्स येथून कामावरून सुटल्यानंतर दुचाकी (एमएच 08 क्यू 3382) वरून भाटये येथे आपल्या घरी जात होत़े रात्री 11.40 वाजण्याच्या सुमारास ते साळवी स्टॉप येथे आले असत़ा त्यांच्या समोर असलेली रिक्षा (एमएच 08 ई 7840) हिला कार (एमएच 09 डीए 2958) ने समोरून धडक दिल़ी या अपघातात रिक्षा मागे येवून दुचाकीवर धडकल़ी या अपघातात दुचाकीवरील दत्ताराम सुर्वे हे रस्त्यावर पडून जखमी झाल़े तर रिक्षाचालक रियाज शेगळे यांना गंभीर दुखापत झाल़ी
अपघातानंतर जखमींना तातडीने जवळील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल़े पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्यापकरणी श्र्वेतांग वायंगणकर याच्याविरूद्ध भादंवि कलम 279,337,338,मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केल़ा पुढील तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आह़े









