रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरीतल्या सभेचं ठिकाण बदललं या पूर्वी येथील जवाहर मैदानावर राज ठाकरे यांची सभा घेण्यात येणार होती. मात्र रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यांनी जवाहर मैदान कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभांसाठी दिले जाणार नाही, असे सांगितल्याने अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या मैदानातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा अर्थात प्रमोद महाजन क्रिडा संकुल मैदानावर राज ठाकरे यांची सभा घेण्यात येणार आहे. 6 मे रोजी होणार राज ठाकरे यांची जाहीर सभा रत्नागिरी जिल्ह्यात होणार आहे. याबाबत मनसे कडून संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे.









