मौजे कुवांरबाव, रत्नागिरी येथे सर्वे. नं. १३, हिस्सा नं. २, क्षेत्र ३४.५० हे. आर. या शासकीय जागेचा ताबा मागील दीड- दोन वर्षापासून एका प्रायव्हेट स्पोर्ट्स क्लब ने घेतलेला होता. त्या अनधिकृत बांधकामा विरोधात अनेक ग्रामस्थांनी तक्रारी अर्ज संबंधित सरकारी कार्यालयाला दिले होते. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी तेथे खुद्द तहसीलदार आणि टीम उपस्थित होती.
तथाकथित स्पोर्ट्स क्लब रजिस्टर नसताना खोट्या लेटरहेड आधारे पाणी कनेक्शन, वीज कनेक्शन मिळवले होते. ते बेकायदेशीर सिद्ध झाल्यावर सरकारी यंत्रणेकडून वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. आधी अतिक्रमण केले आणी नंतर प्रस्ताव दिल्याच्या बतावण्या करण्यात येत होत्या. या विषयासाठी ग्रामस्थ १५/०८/२०२३ रोजी उपोषणास बसणार होते . परंतु शासन मनाई आदेश आणि निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या विनंती नंतर उपोषण मागे घेण्यात आले. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी नुसार शासकीय यंत्रणेकडून ते अतिक्रमण हटवण्यात आले. अतिक्रमण करणाऱ्या अश्या लोकांना कायदा सर्वश्रेष्ठ असल्याची जाणीव होणे गरजेचे होते. सामान्य माणसाला कर्तव्य आणि अधिकारांची संविधानिक शक्ती अनुभवता आली. ग्रामस्थांनी एक वर्ष कायदेशीर मार्गाने या अतिक्रमण कर्त्यांच्या विरोधात लढा दिला होता.









