शेंबवणेत शिवभक्तांनी एकत्र येत स्वखर्चाने बांधले मंदिर
राजापूर / वार्ताहर
अनेक गावात गणपतीचे, शंकराचे, विठोबाचे प्रत्येकजण आपल्या इच्छेपमाणे मंदिरे बांधतात, मात्र तालुक्यातील शेंबवणे गावात इतर देवळे असून येथील शिवभक्तांनी एकत्र येत स्वखर्चातून छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्याची किमया साधली आहे.
तालुक्यातील शेंबवणे गावी नुकतीच शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावांमध्ये देवदेवतांची मंदिरे आढळतात, मात्र महाराष्ट्राचे आराध्यदैवत अशी बिरूदावली लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर मात्र आढळत नाही. त्यामुळे शेंबवणे गावातील शिवप्रेमींनी गावात छत्रपती शिवाजी महारांजाचे मंदिर उभारले आहे. या मंदिरामध्ये शेंबवणे गावचे वतनदार शिरीष शेंबवणेकर तसेच ग्रामस्थ रमेश कातकर यांच्याहस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
शिवभक्तांनी हे मंदिर स्वखर्चाने बांधले आहे. या मंदिर उभारणीसाठी शिवभक्त सुरज कातकर, बापू नवलू, अशोक आगटे, रूपेश कातकर, कल्पेश कातकर, मनोज फळसमकर, प्रसाद फळसमकर, प्रशांत फळसमकर, सुरेंद्र फळसमकर, अक्षय नाचणेकर, नितेश कांबळे, गणेश कांबळे, जगन कातकर, प्रणित कातकर, नीरज आगटे, बाबू आगटे, विशाल कातकर, शैलेश कातकर, रोहित फळसमकर, जयेश कातकर, संदेश कातकर, धनराज कातकर, उद्देश आगटे, सिद्धेश शिंदे, चेंतन शिंदे, प्रमोद आग्रे, बारक्या पिलंके आदींनी दिवस-रात्र मेहनत घेतली.
शिवजयंतीचे औचित्य साधून शेंबवणे गावातील तरूणांचा समावेश असलेल्या वास्तव किएशन कलामंच, मुंबई यांनी ‘कन्यादहन’ हे नाटक सादर केले. या नाटकाला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच वैष्णवी कुळ्ये, उपसरपंच अनुजा पवार, विश्वनाथ सावंत, मनोज राठोड, विष्णू सपे, जयवंत राठोड, हरिश्चंद्र आगटे, शिवराम मांडवकर, जनार्दन कातकर, अनंत सावंत, नामदेव फळसकर, मुन्ना कुळ्ये यांच्यासह गांगोचीवाडी महिला ग्रामविकास मंडळ तसेच जय शिवराय मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यकमासाठी जय गणेश मधलीवाडीतील शिवभक्तांचे सहकार्य लाभले.









