क्लिनर गंभीर जखमी
रत्नागिरी प्रतिनिधी
मुंबई- गोवा महामार्गावरील हातखंबा येथे दर्ग्याजवळील उताराच्या वळणावर सोमवारी सकाळी ७.४५ च्या दरम्यान साखर घेऊन येणारा ट्रक उलटला. त्यात चालक जागीच ठार झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. साखरेची पोती भरलेला ट्रक (केए २३ ए ६६९४) कर्नाटकातून जयगड बंदराकडे चालला होता. हातखंबा येथील उतारावर नियंत्रण सुटल्याने तो बाजूच्या मोकळ्या जागेत उलटला. ट्रकचा चालक फारुख इसाक जमादार (३८) जागीच ठार झाला. तर क्लिनर कमरान कलादगी (२४) गंभीर जखमी झाला आहे. दोघेही बागलकोट, कर्नाटक येथील आहेत. ट्रक उलटला येथे याच वेळी येथे दोन बैल चरत होते. या ट्रकच्या धडकेने त्यातील एक बैल जागीच ठार झाला.









