रत्नागिरी : प्रतिनिधी
एक हात मदतीचा कार्यक्रमांतर्गत नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित नागरिकांना 13 लाख 8 हजार 540 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.
1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हयात 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा या कार्यक्रमांतर्गत जिल्हयात नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित नागरिकांना अनुदान वाटप करण्यात आले. एक हात मदतीचा या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये 2 मयत, 3 जखमींना 8 लाख 5 हजार 400, तर मोठे दुधाळ 4, लहान दुधाळ 2, ओढकाम करणारे 2 यांना 2 लाख रुपयांचा, तसेच जिल्ह्यात 1 पुर्णतः पडझाड झालेली कच्ची घरे 1, अंशतः पडझाड झालेली कच्ची घरे 26, पक्की घरे 30, गोठे 7 यांना 3 लाख 3 हजार 140 रुपये असे एकूण 13 लाख 8 हजार 540 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.
खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांचे विमा उतरविण्याकरिता देय असलेले विविध दाखले देण्याकरिता जिल्हयात विविध ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांमध्ये 4052 व्यक्तीची उपस्थिती राहून 1096 अर्ज प्राप्त झाले. या शिबीरांच्या माध्यमातून 1272 दाखले वितरीत करण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 जनजागृतीचे जिल्हयात 62 शिबिरांचे आयोजित करण्यात आले ज्यामध्ये 2594 व्यक्तीने सहभाग घेतला.









