दापोली/प्रतिनिधी
मोहम्मद पैगंबर यांच्या विरुद्ध अवमानकारक टिप्पणी करणाऱ्या नुपूर शर्मा व इतर व्यक्तींविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याकरिता दापोली तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून निवेदन देण्यात आले.
तसेच अलीकडे काही सोशल मिडीयाच्या माध्यामातून मुस्लिम धर्माविरुध्द द्वेष पसरवणारे व्हिडीओ, बातम्या प्रसारित करण्याचा प्रकार चालू आहे. त्यामुळे देशाची सामाजिक ऐकता बिघडत आहे. धार्मिक द्वेष पसरत आहे. तरी आपण प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच आपण सोशल मीडियावर कोणत्याही जातीविरोधात किंवा मुस्लिम धर्माविरोधात चुकीची माहिती सांगणे, बोलणे, फोटो व व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यावर तसेच चुकीची माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी अशी विनंती देखील या निवेदनाने करण्यात आली आहे. यावेळी दापोली तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते









