अर्थ व सांख्यिकीय उपसंचालक निवास यादव यांची माहिती
रत्नागिरी प्रतिनिधी
मागील वर्षाच्या तुलनेत 25 हजार 888 ची वाढ करत रत्नागिरी जिल्हा दरडोई उत्पन्नात राज्यात 8 व्या क्रमांकावर असल्याची माहिती अर्थ व सांख्यिकीय उपसंचालक निवास यादव यांनी दिली.
संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. दरडोई उत्पन्न काढण्यासाठी 2011-12 हे वर्ष पायाभूत धरण्यात आले आहे. त्यावर्षी जिल्हयाची दरडोई उत्पन्न हे 84 हजार 833 रुपये इतके होते. मागील वर्षी म्हणजेच 2020-21 ला 1 लाख 71 हजार 196 रुपये इतके होते. ते 25 हजार 888 रुपयाने वाढून सन 2021-22 ला 2 लाख 1 हजार 84 रुपये इतके झाले आहे.
कृषी 5 हजार 767, पशुसंवर्धन 1 हजार 35, वने व लाकूड तोडणी 1 हजार 572, मस्त्यव्यवसाय 931, कृषी आणि कृषी पूरक 9 हजार 305, खाण व दगड खाणकाम 140, वस्तू निर्माण 4 हजार 13, बांधकाम 1 हजार 760 तसेच उद्योग 6 हजार 447 या निव्वळ जिल्हा उत्पन्न क्षेत्रवारांचा यात समावेश आहे.