खेड प्रतिनिधी
बँकेच्या कर्ज हप्त्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी ओमकार राजेंद्र चिखले (वाणीपेठ खेड) याला येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. एम. चव्हाण यांनी कोर्ट उठेपर्यंत साध्या शिक्षेसह 53 हजार 800 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ओमकार चिखले याने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून कर्ज घेतले होते. बँकेच्या वसुलीदरम्यान त्याने परत फेडीसाठी धनादेश दिला होता. हा धनादेश न वटल्याने त्याच्याविरुद्ध येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. 53,800 रुपये दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. बँकेच्यावतीने ॲड. संदेश वंदना गणपत चिकणे यांनी काम पाहिले.









