रत्नागिरी प्रतिनिधी
लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी संगमेश्वर येथे यशस्वी सापळा कारवाई केली आहे. यामध्ये प्रशांत प्रदिप शिर्के, सरपंच, ग्रामपंचायत राजीवली.ता. संगमेश्वर आणि सचिन रमेश पाटोळे, उप सरपंच, ग्रामपंचायत राजीवली. या दोघांना 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आले आहे.
यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांच्या मित्राच्या वतीने सदर ग्रामपंचायत चे अखत्यारीतील पाखाडी तयार करणेचे काम त्यांनी केले होते. तक्रारदार यांनी यापूर्वी केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला व सध्या पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्याचा मोबदला म्हणून लोकसेवक प्रशांत शिर्के, सरपंच, ग्रामपंचायत राजीवली व इतर लोकसेवक सचिन पाटोळे, उपसरपंच ग्रामपंचायत राजीवली, तालुका संगमेश्वर यांनी तक्रारदार यांचेकडे 40,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 30,000/- रुपये लाचेची मागणी करून मागणी केलेली लाच रक्कमेपैकी 15000/- रू. सरपंच प्रशांत शिर्के यांनी व 15000/- रू. उपसरपंच सचिन पाटोळे यांनी आज रोजी स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले असून इतर लोकसेवक क्र. 1 व 2 यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
Previous Articleकासेगाव येथे आढळला अनोळखी मृतदेह
Next Article जिल्ह्यातील 30 लाख 37 हजार 368 मतदारांनी बजावला हक्क









