रत्नागिरीचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यामागे एसीबीचे शुक्लकाष्ठ लागले असतानाच आज त्यांच्या मतदारसंघातील ग्रामरंचायतींच्या चौकशी करण्यात आली. आमदार फंडातून केलेल्या कामाची चौकशी झाली असून वर्क आँर्डपासून फंडातून अदा केलेल्या बीलांची माहीतीसाठी प्रामुख्याने सरपंच आणि ग्रामपंचायत ठेकेदार यांची करण्यात आली.
शिवनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गटाबरोबर जाणारे रत्नागिरीचे आमदार वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी केली जात असतानाच आज आमदार नाईक यांच्या मतदार संघातील काही ग्रामपंचायतींची तौकशी एसीबी कडून करण्यात आली. यामध्ये विशेषत्वाने आमदार नाईक यांच्या गटातील सरपंचांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. तसेच काही ठेकेदारांचीही चौकशी केली गेली. सर्वांची संरपंचांची वेगवेगळी चौकशी जाली असून ही प्रत्येकी अर्धा अर्धा तास झाल्याचे सूत्रांनी कळवले आहे.
यामध्ये कुडाळ तालुक्यातील भरणी गावच्या सरपंच अश्विनी मिस्त्री यांची देखील चौकशी झाली. आमदार फंडातून खर्च केलेल्या कामाची चौकशी झाली असून वर्क आँर्डपासून फंडातून अदा केलेल्या बीलांची सरपंच आणि ठेकेदारांकडून माहीती मागवली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









