दापोली प्रतिनिधी
रत्नागिरी – दापोली शहरात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने रस्ते ओलेचिंब झाले. ऐन उन्हाळ्यात दापोलीत रिमझिम पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला. यापुर्वीच जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती.
रणरणत्या उन्हामुळे हैराण झालेल्या लोकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पावसाच्या हलक्या सरींमुळे दापोलीसह परिसरामध्ये सुखद गारवा अनुभवायला मिळाला. दोन दिवसापुर्वी हवामन खात्याने कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. आज हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला.









