मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती; विविध कलांचे होणार सादरीकरण; तानाजी चोरगे यांची माहिती
रत्नागिरी प्रतिनिधी
कोरोना काळानंतर कोकणच्या लोककलाना त्यांचा पूर्वीचा आत्मविश्वास आणि संपन्नता प्राप्त व्हावी, यासाठी चिपळूण येथे भव्य लोककला मेहत्सवाचे आयोजन करण्यात आले आह़े 21, 22, 23 जानेवारी 2023 या काळात हा महोत्सव जुन्या कालभैरव मंदिर परिसराच्या मोकळ्dया जागेत होणार आह़े लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्यावतीने महोत्सवासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे यांनी दिल़ी.
जिल्हा मध्यवर्ती बँक येथे आयोजित पत्रकार परिषदेत चोरगे बोलत होत़े महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार आह़े तर स्वागताध्यक्ष म्हणून पालकमंत्री उदय सामंत, संयोजक समितीचे उपाध्यक्ष म्हणून आमदार शेखर निकम तसेच आमदार पसाद लाड, योगेश कदम, पशांत यादव, ड़ॉ यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत़. लोककला महोत्सवात जिह्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आली आह़े. कोकणातून म्हणजेच पालघर, ठाण्यापासून सावंतवाडीपर्यंतच्या अनेक लोककला घेऊन अनेक कलावंत या महोत्सवात सहभागी होतील. लोककलांच्या सादरीकरणासोबतच या कलासंबंधी अनेक अभ्यासपूर्ण परिसंवाद, चर्चा, मुलाखती, व्याख्याने यांचाही समावेश या महोत्सवात असेल. संदर्भमूल्य असणारी एक संग्राह्य स्मरणिका यानिमित्ताने प्रकाशित व्हावी, असा प्रयत्न सुरू आह़े.
कोकणच्या लोककलांसोबतच रत्नागिरी जिह्यातील अस्तंगत होत चाललेला सांस्कृतिक ठेवा जपला जावा, यासाठी एका भव्य लोकगीत स्पर्धेचे आयोजन यानिमित्ताने केले आहे. दशावतार, चित्रकथी, तारपा, खालूबाजा, पालखीनाच, नमन, भारूड, जाखडी, गोमू, काटखेळ, संकासूर, डेरा, कव्वाली, जलसा, गज्जो, कातकरी व आदिवासी लोकगीते, जात्यावरच्या ओव्या व भलरी यासारखी श्रमगीते, लग्न तथा बारसे अशाप्रसंगी म्हटली जाणारी विधीगीते, होळी, गणपती, इतर धार्मिक कार्यक्रम याप्रसंगी म्हटली जाणारी मंत्रगीते या सोबतच डाक, मोठ्या बाया अंगात येणे अशा अशुभ व अंधश्रद्धा वाटणाऱया प्रसंगी म्हटली जाणारी गीतेही स्पर्धेत अपेक्षित आहेत़ आधुनिकीकरणाच्या रेट्यात लयास गेलेला आपल्या जिह्याच्या सामाजिक इतिहासाचा हा भाग जपावा, या उद्देशाने याचे संकलन सुरू झाले आह़े
या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 21 हजार रूपये, दुसरे बक्षीस 15 हजार रूपये, तिसरे बक्षीस 11 हजार रूपये, चौथे बक्षीस 7 हजार 500 रूपये पाचवे बक्षीस 5 हजार रूपये उत्तेजनार्थ 1 हजार 111 रूपयाची 10 बक्षिसे अशी एकूण 65 पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. स्पर्धेसाठी अंतिम मुदत 20 डिसेंबर 2022 अशी आहे. या स्पर्धेत आलेल्या निवडक लोकगीतांचा संपादित संग्रह पुस्तक रूपाने प्रकाशित केला जाणार आहे. या लोककला महोत्सवात यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कमेसोबतच सन्मानचिन्ह, पुस्तके आणि हापूस आंब्याचे कलम देऊन गौरवण्यात येणार आहे.
रोजगार निर्मितीत बँकेच्या समावेशाबाबत चोरगेंचे मौन
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत जिल्हा बँकेचा समावेश करण्यात आल्याबाबत नुकतेच राज्य शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले होत़े. या बाबत बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे यांनी विचारले असता आपल्याला याविषयी आता काहीही बोलावयाचे नाही, अशी पतिकिया दिल़ी









