रत्नागिरी प्रतिनिधी
पावसाच्या चालू हं हंगामात प्रथमच मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे मुंबई महामार्गाला दणका बसला आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील निवळी येथे रस्ता खचला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा ते निवळी यादरम्यान रस्ता खचला. आज सकाळी रस्त्याच्या मधोमध मोठा चर पडल्यामुळे बराच काळ वाहतूक खोळंबली होती. गेले कित्येक वर्षे गजावाजा करत मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र अजूनही चाळीस ते पन्नास टक्केच काम शिल्लकच आहे. या महामार्गावरून काही ठिकाणी अद्याप एकेरी वाहतूक सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा ते निवळी परिसरात कालपासूनच रस्ता खचण्यास सुरुवात झाली होती. असे असतानाही या बाबीकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले होते. अखेर वाहतूक कोळंबल्यामुळे जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या मधोमध पडलेला चर भरण्यात आला आणि खोळंबलेली वाहतूक सुरू करण्यात आली.