रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा रत्नागिरी शहरात झाली. मात्र या सभेसाठी लावण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बँनरमधून काही पदाधिकाऱ्यांचे फोटोच गायब झालेले दिसून आले.
जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या बँनरमधून तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांचा फोटो गायब होता. शहर उपाध्यक्ष अमोल श्रीनाथन यांच्या बँनरमधून सरचिटणीस वैभव खेडेकर गायब तर माजी जिल्हाध्यक्ष छोटू खामकर यांच्या बँनरवरुन जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर गायब झालेले दिसून आले. रत्नागिरीतील लागलेल्या बँनरमुळे रत्नागिरीतील मनसेत असलेले गटतट समोर आलेत त्यामुळे हे गटतट राज ठाकरे सोडवणार का….? यापुर्वी राज ठाकरे यांच्या रत्नागिरीतील दौऱ्यात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची कान उघडणी केली होती रत्नागिरीतील मनसे नेमकी कुणाची जिल्हाध्यक्षांची की तालुकाध्यक्षांची असा सवाल राज ठाकरे यांनी त्यावेळी उपस्थित केला होता आणि सर्वांना खडेबोल सुनावले होते मात्र आता पुन्हा एकदा बँनरवरुन रत्नागिरीतील मनसेत आंतर्गत धुसफूस असल्याचं समोर आले आहे..