राजापूर प्रतिनिधी
पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ प्रकल्प विरोधकांनी येथील तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्च्याला जोरदार प्रतिसाद लाभला शहरातील गणेश विसर्जन घाट ते तहसील कार्यालय या दरम्यानचा परीसर प्रकल्प विरोधी घोषणांनी दणाणून गेला. हातात फलक झळकावत विरोधकांच्या संतप्त भावना पहायला मिळाल्या.
सकाळी ११ च्या आसपास मोर्च्याला सुरुवात झाली होती. तत्पूर्वी नाणार ,बारसू सोलगाव यासह अन्य जिल्ह्यातूनही प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आणि वारीशे कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून अनेकजण मोर्च्यात सहभागी झाले होते खर्ली नदीपात्रात आलेल्या सर्व वाहनातील प्रकल्पग्रस्त उतरले आणि थेट गणेश विसर्जन घाटाकडे रवाना झाले. तेथे खासदार विनायक राऊत यांनी उपस्थीताना मार्गदर्शन केल्यानंतर हळहळु मोर्च्याला सुरुवात झाली वारीशे यांची हत्या करणारा संशयीत आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा तीव्र निषेध व्यक्त करणारे फलक आणि बुलंद घोषणा दिल्या जात होत्या तर दिवंगत वारीशेला न्याय मिळालाच पाहिजे त्याच्या खुन्याला फाशी किंवा जन्मठेप झालीच पाहिजे रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे असे फलक मोर्च्यात झळकत होते बुलंद घोषणा सुरु होत्या उन्हातान्हातून आंदोलक चालले होते मोर्च्यात महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
आयोजीत मोर्चा लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता लांजा नाटे रत्नागिरीतुन पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. दुपारी मोर्च्या तहसील कार्यालयात आल्यावर तहसील आवारात प्रचंड गर्दी झाली होती त्यावेळी आंदोलकांच्या नेत्यांनी प्रथम आपली मनोगते व्यक्त केली त्यामध्ये कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शासन प्रशासन रत्नागिरी पोलीस यांच्यावर जोरदार टिका केली आम्हाला मोर्चे काढायला परवानगी दिली जात नाही तर दुसरीकडे विरोध करणाऱ्यावर हल्ले होत आहेत हे प्रकार शासनाला चालतात का अशी संतप्त विचारणा त्यांनी केली कोकणातून रिफायनरी हद्दपार झालीच पाहिजे हा प्रकल्प रद्द होणे म्हणजे दिवंगत वारीशेच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल त्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा . पायाला भिंगरी लावून आता पळायचे आहे असे सांगताना रिफायनरी हद्दपार करण्यासाठी लढायचे असे त्यांनी ठासून सांगितले त्यानंतर आंदोलकांच्या निवडक मंडळींना तहसीलदार शितल जाधव यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले.त्यावेळी आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या संशयीत आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा प्रतिकात्मक पुतळा मोर्च्या दरम्यान आणण्यात आला होता त्याला जोडे मारुन उपस्थीत महिलांनी आपला संताप व्यक्त केला.