रायगड प्रतिनिधी
मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून पनवेल रेल्वे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत ९३ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई ते मंगलोर रेल्वेमार्गावर धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार मत्स्यगंधा एक्स्प्रेस पनवेल रेल्वे स्थानकावर आल्यानंतर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी संपूर्ण रेल्वेची कसून तपासणी केली, या संयुक्त कारवाई मध्ये ९३ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात येत असून या दोन महिला हा मद्यसाठा आंध्र प्रदेशात घेऊन जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.