गुहागर : प्रतिनिधी
गुहागर चिपळूण या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर देवघर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहाटे ४ च्या सुमारास ही घटना झाली असल्याचा अंदाज वनविभागाच्यावतीने व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील गुहागर चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील देवघर स्टॉप पासून 200 मीटर अंतरावर नर जातीचा हा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. मृता अवस्थेत असलेला हा बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच साधारण ७ ते ८ वर्ष वयाचा हा बिबट्या आहे. वनविभागाला याची माहिती मिळताच वनपाल संतोष परशेटे, वनरक्षक अरविंद मांडवकर , दुडगे यांनी पहाटे ६.३० वाजता घटनास्थळी पोहोचून बिबट्याचा शव ताब्यात घेतला आहे. या घटनेचा पुढील तपास परीक्षेत्र वन अधिकारी चिपळूण राजश्री कीर करत आहेत.









