राजापूर वार्ताहर
राजापूर तालुक्यातील उपळे गावात तळेखाजण-पिंदावन रस्त्यालगत फासकीत अडकलेल्या बिबट्याला वनविभागाने सुमारे दोन तासाच्या अथक पयत्नानंतर पिंजऱयात पकडून जीवदान दिले आहे. दरम्यान पकडलेला बिबट्या मादी जातीचा असून सुमारे दीड वर्षे वयाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
शुकवारी सकाळी उपळे गावातील उपळे-तळेखाजन-प्रिंदावन रस्त्याच्या डाव्या बाजूला फासकीत बिबट्या अडकल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती व शिवसेना तालुकापमुख कमलाकर कदम यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारा श्रीम. प्रियंका लगड, राजापूर वनपाल सदानंद घाटगे, लांजा वनपाल दिलीप आरेकर, पाली वनपाल न्हानू गावडे, राजापूर वनरक्षक विक्रम पुंभार, लांजा वनरक्षक सुरज तेली, कोर्ले वनरक्षक श्रीम.श्रावणी पवार यांच्यासह रेस्कू टिमचे दिपक चव्हाण, प्रथमेश म्हादये, निलेश म्हादये, विजय म्हादये, गणेश गुरव, दिपक म्हादये आदी घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्या फासकीत अडकल्याची बातमी पसरल्याने परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. अशातच बिबट्या रस्त्यालगत असलेल्या अडचणीच्या जागी अडकल्याने त्याला पिंजऱयात बंद करणे जिकरीचे काम होते. मात्र वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच रेस्कू टीमचे सदस्य यांनी पयत्नांची शर्थ करत अखेर बिबट्याला पिंजऱयात बंद केले. त्यानंतर राजापूरचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून नंतर बिबट्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सदर बिबट्या मादी जातीचे असून त्याचे अंदाजे वय 1 ते 1.5 वर्षे आहे. बिबट्याची लांबी 102 सें.मी. व उंची 70 सें.मी. असल्याची माहिती वनविभागाने दिली.
दरम्यान, सदरची कार्यवाही विभागीय वन अधिकारी दि.पो.खाडे, तसेच अतिरीक्त कार्यभार विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण श्रीम.गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली. कुठलाही वन्यप्राणी मानव वस्तीमध्ये आढळून आल्यास किंवा संकटात सापडलेस वनविभागाचा टोल फी क्रमांक 1926 या क्रमांकावर संपर्प साधावा, असे आवाहन परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.