शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी पासून नगरपंचायत करणार कारवाई
लांजा प्रतिनिधी
लांजा शहरातील अनधिकृत खोकेधारकांवर नूतन मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी कारवाईचा बडगा उगारल आहे. या कारवाईत १६ खोके धारकांना नोटिसा धाडण्यात आल्या असून तीन दिवसात खोके हटविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या कारवाईचे लांजा शहरवासीयांनी स्वागत केले आहे.
लांजा शहरात अनधिकृत खोके यांची मोठ्या प्रमाणात उभारणी झाली आहे. मात्र नुकताच कार्यभार हाती घेतलेल्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी जिल्हा परिषद शाळा लांजा नं.५ या शाळेच्या मार्गावरील सर्व अनधिकृत खोकेधारकांना नोटीसा बजावल्या आहेत. गुरुवार दिनांक ५ ऑक्टोबर पर्यंत अनधिकृत खोके काढण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली असून तीन दिवसांत खोके न हटवल्यास नगरपंचायतीच्यावतीने शुक्रवार ६ ऑक्टोबर पासून ते हटविण्यासाठीची मोहीम हाती घेऊन अनधिकृत खोके हटविण्यात येणार आहेत.