रत्नागिरी: प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील रत्नागिरी-काजरघाटी लांजा राज्य महामार्ग खचला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस कोसळलेल्या पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. त्याचा परिणाम नद्यांलगतच्या रस्त्यावर होत आहे
रत्नागिरी-काजरघाटी लांजा राज्य महामार्ग खचला असला तरी या खचलेल्या धोकादायक महामार्गावरून वाहतूक सुरू. गेले काही दिवस चांदेराई हरचेरी दरम्यान काजळी नदीला आलेल्या पुलामुळे परिसरात मोठे पाणी भरले होते. त्याचाच परिणाम म्हणून अतिवृष्टीत रस्ते खचण्याचे प्रमाण वाढले आहे.
रत्नागिरी-काजरघाटी लांजा राज्य महामार्गावरील खचलेल्या रस्त्याला लागून काजळी नदीचे पात्र वाहते. हा रस्ता मुंबई गोवा महामार्गाला आणि रत्नागिरीतून लांज्याला जाण्यासाठी पर्यायी महामार्ग आहे. रत्नागिरी तालुक्यातील
सोमेश्वर, चांदेराई, चिंद्रवली, ओशी, हरचेरी अशी प्रमुख गावे या रस्त्यावर अवलंबून आहेत. प्रशासनाकडून या मार्गावर पाहणी करण्यात आली आहे. परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.









