रायगड: प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गासाठी कोकणातील पत्रकार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. ९ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील वाकण फाटा येथे बोंबाबोंब आंदोलनाची सुरुवात होणार आहे.. २००७ पासून पत्रकारांचे महामार्गासाठी शांततेच्या मार्गानं आंदोलनं केले. या आंदोलनामध्ये कोकणातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकारांच्या सतत पाच वर्षांच्या आंदोलनानंतर महामार्गाचं काम सुरू झालं..पण ते तब्बल 13 वर्षे रखडेले आहे. याला कोकणातील लोक प्रतिनिधींचा नाकर्तेपणाच आहे. मुंबई -गोवा महामार्गावरून कोकणात मोठा असंतोष आणि आक्रोश आहे. यासाठीच ९ तारखेला बोंबाबोंब आंदोलनाबरोबरच SMS आंदोलन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री, पालकमंत्री आणि खासदारांना किमान 10,000 SMS पाठवण्यात येणार आहेत. यातून मुंबई – गोवा महामार्गाबाबतंच्या संघटीत भावना लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळं कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींवर दबाव टाकला जाईल शिवाय कोकणातील जनतेला, अगदी घरी बसून या आंदोलनात सहभागी होता येणार आहे. कोकणातील नागरिकांनी १ SMS लोकप्रतिनिधींना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
SMS कोणाला पाठवायचे? त्यांचे फोन नंबर्स, SMS चा मजकूर हा सारा तपशील ६ तारखेला दिला जाणार आहे. हे सारे SMS एकाच दिवशी म्हणजे ९ ऑगस्ट रोजीच पाठवले जावेत असे आवाहन एस एम देशमुख यांनी कोकणातील जनतेला केले आहे.