रत्नदुर्ग येथील विवाहिता मृतदेह प्रकरण
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह आढळलेल्या तन्वी घाणेकर या महिलेने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आह़े. जिल्हा शासकीय रूग्णालय येथे करण्यात आलेला शवविच्छेदन अहवालही त्याला दुजोरा देत आह़े असे असले तरी पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी केली जात आह़े असे असले तरी तन्वी हिचा पती व नातेवाईक यांच्याकडे पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी रितेश घाणेकर (33, ऱा परटवणे खालचा फगरवठार रत्नागिरी) या 29 सप्टेंबरच्या सायंकाळपासून बेपत्ता झाल्या होत्य़ा या संदर्भात तिचा पती रितेश याने रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी. पोलिसांकडून घेण्यात आलेल्या शोधमोहिमेत तन्वी हिची दुचाकी (एमएच 08 एक्स 7116) भगवती बंदर येथे आढळल़ी. तर मोबाईलचे अखेरचे लोकेशन हे पावस येथे दाखवण्यात येत होत़े. यामुळे विविध तर्कविर्तक लढवले जात होत़े. दरम्यान सोमवारी सायंकाळी तन्वीचा मृतदेह रत्नदुर्ग किल्ल्यावरील कपल पॉईंट येथील 200 फूट दरीत आढळल़ा. तन्वीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल़ा. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालय येथे पाठवण्यात आल़ा. येथे सोमवारी सायंकाळी तन्वी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल़े. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या प्राथमिक अहवालात घातपात नसल्याची शक्यता वर्तवली आह़े तरीही तन्वी हिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जाणार आह़े. तन्वी हिच्याबाबत पोलिसांकडून सर्व माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात येत आह़े. त्यानुसार तन्वीचा रितेश याच्याशी प्रेमविवाह झाला होत़ा, तसेच तन्वी हिला 2 मुले असल्याचेही समोर येत आह़े. तन्वी ही गेल्या काही वर्षापासून शहराबाहेरील एका नामांकित कंपनीत काम करत होत़ी. त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून ही माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आह़े. तन्वी हिने आत्महत्या केल्याने त्यामागे असलेल्या कारणांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आह़े.
फिनोलेक्सच्या टॉवरने पकडले तन्वीच्या मोबाईलचे लोकेशन
तन्वी घाणेकर या बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलिसांत नोंदवण्यात आल्यानंतर तिच्या मोबाईलचे लोकेशनचा पोलिसांकडून शोध घेण्यात आल़ा. यावेळी मोबाईलचे लोकेशन पावस कोळंबे भागात असल्याचे आढळून येत होत़े. पोलिसांच्या तपासात रत्नदुर्ग किल्ल्यावर फिनोलेक्सचा टॉवर मोबाईल रेंज पकडत असत़ो त्यामुळे तन्वी हिच्या मोबाईलला फिनोलेक्सच्या टॉवरची रेंज मिळाली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आह़े.