रत्नागिरी प्रतिनिधी
केरळमधील एका ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, आग लावून ३ प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात फरार असलेला आरोपी शाहरुख सैनी याला पोलिसांनी रत्नागिरीत अटक केली आहे. सेंट्रल इंटेलिजन्स आणि महाराष्ट्र एटीएस यांच्या संयुक्त पथकाने रात्री उशिरा रत्नागिरी रेल्वेस्टेशन जवळून त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलप्पुझा आणि कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये २ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९.४५ च्या दरम्यान, कोझिकोड शहर ओलांडल्यानंतर कोरापुझा रेल्वे पुलावर ट्रेन पोहोचली असताना आरोपी शाहरुख सैफी याने सहप्रवाशांवर एक ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिले होते. या घटनेत एक वर्षाच्या मुलासह, एक महिला आणि एक अन्य व्यक्ती अशा तीन जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह रेल्वे रुळावर सापडले होते. तर इतर ८ प्रवासी जखमी झाले होते.
केरळमध्ये रेल्वेत चढण्यावरून वाद झाल्यानं एका माथेफिरून सहप्रवाशांनाच पेटवल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आरोपीला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या संयुक्त पथकाने ही मध्यरात्री ही कारवाई केली. रत्नागिरी रेल्वे स्टेशनमधून आरोपी शाहरुख सैफीला अटक करण्यात आली आहे. केरळमध्ये २ एप्रिल रोजी रेल्वेत त्याने आग लावली होती. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता तर ९ जण जखमी झाले होते.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी शाहरुखचा शोध केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसकडून घेतला जात होता. त्याचे लोकेशन रत्नागिरीमध्ये आढळून आले होते. रत्नागिरीतल्या रुग्णालयात चौकशी केल्यानंतर त्याचा ठावठिकाणा समजला होता.
केरळमध्ये ट्रेनमध्ये आग लावल्यानंतर खाली उतरताना त्याच्या डोक्याला जखम झाली होती. त्यावर उपचारासाठी तो रत्नागिरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. उपचार घेण्यासाठी तो रत्नागिरी रुग्णालयात गेला. पण उपचार पूर्ण न घेताच त्याने रुग्णालयातून पळ काढला. त्यानंतर रत्नागिरीसह परिसरात केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने त्याचा कसून शोध घेतला. शाहरुख सैफीला रत्नागिरी स्टेशनवरून अटक करण्यात आली. सध्या आरोपी आरपीएफ रत्नागिरी यांच्या ताब्यात असून केरळ पोलिस त्याचा ताबा घेण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाले होते.