रत्नागिरी प्रतिनिधी
देवरुखमधील साडवली येथे अनिकेत जाधव या बौध्द समाजातील युवकास जातीवाचक शिवीगाळ करुन ठार मारण्याचा पयत्न करण्यात येउन त्याच्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली होती. यापकरणी पोलिसांनी गंभीर दखल न घेतल्याने संशयितांना दोन दिवसांत अटक करा. अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे रस्त्यावर उतरण्याचा इशारा रोहित तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पहा VIDEO >>> अनिकेत जाधव मारहाण प्रकरणाची दखल न घेतल्यास ‘वंचित’तर्फे आंदोलनाचा इशारा
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांना सोमवारी वंचित बहुजन आघाडी संगमेश्वर तालुका यांच्यावतीने निवेदनही सादर करण्यात आले आहे. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. साडवली येथे 4 एपिल 2023 रोजी ही घटना घडलेली होती. अनिकेत जाधव या युवकास जातीवाचक शिवीगाळ करण्याचा पकार घडला. यावेळी त्याच्या डोक्यात चिरा आपटून जाधव यास ठार करण्याचा पयत्न करण्यात आला होता. तसेच तकार पोलिसांमध्ये गेल्यास तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू अशी धमकी चार संशयित आरोपींनी दिली होती. त्यामुळे अनिपेत याने त्यावेळी पोलिसांकडे तक्रार सुध्दा न दिल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडे या गंभीर पकाराविषयी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आली. गुन्हासंबधित संशयित गुन्हेगारांची मोठ्या पमाणात दहशत आहे. संशयित गुन्हेगार सराईत आणि निर्ढावलेले असल्याचा आरोप रोहित तांबे यांनी केला आहे.
या पकरणात गुंतलेल्या काही संशयितांबाबत वारंवार पोलिसांमध्ये तकारी दाखल आहेत. यापूर्वी देखील त्यांनी साडवली गावांमधील बॅनर जयंतीच्या दिवशीच फाडून टाकल्याने असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. एवढी दहशत असतानाही संशयित आरोपींवर कडक कारवाईसाठी नरमाईची भूमिका पोलिसांकडून घेण्यात आल्याचा आरोप रोहित तांबे यांनी केला आहे. 14 एपिल 2023 रोजी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र विविध कार्यकमांनी साजरी करण्यात येत असते. पण हा विषय जातीत द्वेषासंबंधीचा असल्याने तालुक्यात किंवा जिल्ह्यात अनुचित पकार घडू नये या स्तरावर जातीवाचक विचार सरणीच्या आरोपींना दोन दिवसांत अटक करावी. अन्यथा समाजाच्या संरक्षणार्थ सर्व स्तरावर वंजित बहुजन आघाडी तालुका संगमेश्वरच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा पोलीस पशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला अशोक पवार, कृष्णा कदम, चंदन कदम, अजित तांबे, अशोक जाधव, राजेंद्र मोहिते, मंगला तांबे, सी.ए.जाधव यांचीही उपस्थिती होती.









