मौजेदापोली वार्ताहर
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे भीषण वणवा लागून आंबा, काजू बागायतींचे नुकसान झाले आहे. यात 25 ते 30 बागायतदारांच्या बागा जळून खाक झाल्याचा अंदाज येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मात्र किती लाखांचे नुकसान झाले, हे स्पष्ट झालेले नाही.
आंजर्ले पुंभारखाण परिसरात वणवा लागल्यानंतर सोसाट्याचा वारा सुटल्याने हा वणवा वाढल्याचे येथील ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. मात्र वणवा कशामुळे लागला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग आटोक्यात आणणे कठीण होते. मात्र लोढा कंपनीकडून 1 ते 2 पाण्याचे टँकर बोलावण्यात आले. मात्र आगीने रौद्ररूप घेतल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास अडचण निर्माण झाली. तरीही गावातील 100 हून अधिक लोकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.









