रत्नागिरी प्रतिनिधी
शहरातील आरोग्य मंदिर येथे मैत्रिचा फायदा उठवत दागिने चोरणाऱ्या महिलेला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आल़ी नंदिनी मोहिते (ऱा टिके सध्या अभ्युद्ययनगर रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आह़े रविवारी तिला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने नंदिनी हिची रवानगी पोलीस कोठडीत केली.
कोमल श्याम पाटील (32, ऱा आरोग्य मंदिर रत्नागिरी) यांनी या प्रकरणी चोरीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल व नंदिनी यांच्यात मैत्रीचे संबंध होते. यातून कोमल हिच्या आरोग्य मंदिर येथील फ्लॅटची चावी नंदिनी हिने मिळवली होती. माहे ऑक्टाबर 2022 ते 26 नोव्हेंबर 2022 दरम्यानच्या काळात नंदिनी हिने कोमल हिच्या घरातील 6 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व 60 हजार रूपयांची रोकड चोरून नेली, अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे.
त्यानुसार पोलिसांकडून नंदिनी हिच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच तिच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.