रायगड : प्रतिनिधी
महाड येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहत मधील प्रसोल केमिकल कंपनीमध्ये आज गुरुवारी ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास हायड्रोजन सल्फाईड वायूची गळती झाली. यामध्ये कंपनातील एकाचा मृत्यु झाला असून 4 कामगार अत्यवस्थ असल्याची माहीती समोर येत आहे.
अधिक माहीतीनुसार महाड येथिल औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या प्रसोल कंपनीमध्ये अचानक हायड्रोजन सल्फाईड या वायुची गळती झाली. या दुर्घटनेत अकिल महेंद्रसिंग वय वर्ष १९ या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अत्यवस्थ असलेला संतोष मोरे याला उपचाराकरिता मुंबई येथे हलविण्यात आले आहे. तसेच इंद्रजीत पटेल, (३५) , परवेश ठाकूर,(२३)पंकज डोळस (२७) यातीघां वर महाडमधील न्यू लाईफ हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रसोल या कंपनीमध्ये वारंवार अशा घटना घडल्यामुळे तसेच वायुगळतीमुळे आरोग्यास धोका निर्माण झाल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी देखील ही कंपनी बंद करण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षेच्या उपायोजना केलेल्या दावा केला आणि कंपनी पुन्हा सुरू करण्यात आली होती. परंतु आत्ताच्या या घटनेनंतर ही कंपनी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.