रत्नागिरी प्रतिनिधी
तालुक्यातील वेळवंड येथे विष प्राशन केल्याने वृद्धेचा मृत्यू झाल़ा इंदिरा लक्ष्मण धुमाळी (75, ऱा कोंडवाडी वेळवंड) असे मृताचे नाव आह़े इंदिरा यांच्यावर रत्नागिरी शहरातील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत हेत़े उपचारादरम्यान इंदिरा यांचा मृत्यू झाल़ा या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरा या 9 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 6 वाजता घराशेजारी अस्वस्थ अवस्थेत आढळून आल्य़ा यावेळी त्यांच्या हातामध्ये विषारी द्रव्य होत़े यावेळी नातेवाईकांनी इंदिरा यांना उपचारासाठी रत्नागिरीमधील खासगी रूग्णालयात दाखल केल़े उपचार सुरू असताना सायंकाळी ७.३० च्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंदिरा यांना मृत घोषित केल़े या पकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.