रत्नागिरी तालुक्यातील तोणदे भंडारवाडीतील प्रकार
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील तोणदे- भंडारवाडी येथील अंगणवाडीत स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या धान्यामध्ये मेलेली पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. लाभार्थीनेच ही माहिती कळवल्यामुळे ठेकेदाराचे धाबे दणाणले आहेत.
अशा प्रकारे निकृष्ट धान्य वितरित करत असल्याने संबंधित दोषींवर कडक कारवाईची मागणी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे. तसेच अंगणवाड्यांना भेट देऊन तपासणी करा अशीही मागणी त्यांनी केली आहे.









