दापोली प्रतिनिधी
दापोली तालुक्यामधील मुरुड खालचीवाडी येथून सुमारे 69 लाख 2 हजार रुपये किमतीचा 17 किलो 255 ग्रॅम चरस (हशिष) या अमली पदार्थाच्या तब्बल 15 पिशव्या दापोली पोलिसांनी जप्त केल्या.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी मुरुड खालची पाखाडी येथे अरबी समुद्राच्या किनारी बेवारस रित्या टाकलेल्या स्थितीत हे चरस आढळून आलेले आहे. जगभर पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुरुड समुद्रकिनारी असा प्रकार पहिल्यांदाच उघडकीस आल्याने दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे.









