दापोली, प्रतिनिधी
Dapoli : सोंडेघर ते मंडणगड रस्त्यावर शिरखल-आदिवासीवाडी फाट्याजवळ खवले मांजर खवले तस्करीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानुसार दहशतवाद विरोधी शाखा रत्नागिराच्या पोलीस पथकाने लावलेल्या सापळ्यात एका वृध्दाला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
याची फिर्याद दापोली वनविभागाचे वनरक्षक जी.एम.जळणे यांनी दिली. यात संशायित आरोपी बाळा गणपत लोंढे (वय-82,रा.कोटीवाडी पालगड ता.दापोली) याला पोलिसांनी ताब्यात घेत वन्यजीव संरक्षण कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाई पथकात रत्नागिरीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार पी.पी.बोरकर,पोलीस हेडकॉन्स्टेबल भुजबळराव,हेडकॉन्स्टेबल उदय चांदणे, हेडकॉन्स्टेबल महेश गुरव,हेडकॉन्स्टेबल आशिष शेलार,चालक हेडकॉन्स्टेबल ओंकार सावंत तसेच वनविभागाचे वनरक्षक जी.एम.जळणे सहभागी झाले होते.या प्रकरणी अधिक तपास कॉन्स्टेबल मिलिंद चव्हाण करत आहेत.









