रत्नागिरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासन आपल्या दारी या शासकीय उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी उद्या दि. २५ मे रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त मोठया प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता असल्यामुळे वाहतुकींची कोंडी होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम.देवेंदर सिंह, यांनी वाहतूक मार्गात बदल केला आहे.
तो बदल पुढीलप्रमाणे :- शहरातील आठवडा बाजार चौक ते काँगेस भवन नाका, काँग्रेस भवन ते मुरलीधर मंदीर, फडके उद्यान ते भुते नाका असा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांकरिता प्रवेश बंद करण्यात येणार असून पर्यायी मार्ग म्हणून भुते नाका ते 80 फुटी हायवे, सुभेदार चौक, पांढरा समुद्र मार्गे परटवणे गाडीतळ अशा मार्गे वाहतूक वळविण्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. या बदलेल्या पर्यायी वाहतूक मार्गाची वाहनधारकांनी नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या वाहतुक बंदी कालावधीतील वाहतूक नियमनाबाबत शहरवासियांना माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे व फलक उभारण्याची कार्यवाही वाहतुक पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी करणार असून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कै. प्रमोद महाजन क्रिडा संकुल, आठवडा बाजार, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.