रायगड प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात एका ऑइल टँकरला भीषण आग लागली . या आगीमध्ये 3 जणांचा भाजून मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खंड्याळ्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
मुंबई-पुणे महामार्गावरुन जाणाऱ्या टँकरला ब्रिजवर आग लागली. ही आग इतकी भीषण होती की तिच्या झळांमुळे ब्रिजखालील 2 वाहनांनी पेट घेतला. जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील ज्या 2 गाड्यांना आग लागली त्यापैकीच एका गाडीमध्ये महिला बसली होती. अचानक गाडीला आग लागल्याने तिला बाहेर पडता आलं नाही. त्यामुळेच ती गंभीर स्वरूपात भाजली, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर किमान एक तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी लागेल असं पोलिसांनी सांगितले . पोलिस यंत्रणा, देवदूत यंत्रणा आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एकाच वेळी 3 वाहनांना आग लागल्याची माहिती मिळत आहे.









