चिपळूण-खेडकडून येणाऱ्या बसेसना पोलीस रोखत असल्याने आगारांकडून फेऱ्या बंद : प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल सुरू : परशुराम घाट बंद असल्याने उद्भवलीय परिस्थिती
प्रतिनिधी/चिपळूण
दरडी कोसळण्याचा धोका असल्याने परशुराम घाट 9 जुलैपर्यंत सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे इतके दिवस पर्यायी एकेरी मार्गावरून लहान वाहनांसह एसटी बसेस सुरू होत्या. मात्र शुक्रवारपासून या बसेसनाही पोलीस रोखत असल्याने आगारांनी फेऱ्या बंद केल्या आहेत. याचा फटका प्रवासी व विद्यार्थ्यांना बसत आहे.









