पैसे न दिल्याने फोटो एडीट करून बदनामी
प्रतिनिधी/रत्नागिरी
ऑनलाईन कर्ज प्रकरणातील पैसे न दिल्याने तरूणाचा फोटो एडीट करून बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. सम्राट सहदेव गवळी (22, रा.पाली बाजारपेठ रत्नागिरी) असे या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने अज्ञात संशयिताविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तकार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सम्राट याने नवीन मोबाईल घेण्यासाठी प्ले स्टोअर वरून ऑनलाईन लोन ॲप डाऊनलोड केले होते. त्यावरून त्यांनी 2 हजार 277 रूपयांचे लोन घेतले होते. त्या लोनचे त्यांना 7 दिवसांत 3 हजार 796 रूपये भरावे लागणार होते. सम्राट याने हे पैसे भरल्यानंतर त्यांच्याकडे आणखी पैशाची मागणी करण्यात आली. हे पैसे देण्यास सम्राट यांनी नकार दिला. याचा राग मनात ठेवून संबंधित व्यक्तीने सम्राट याचा फोटो एडीट करून त्याद्वारे बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला. अशी तक्रार सम्राट याच्यांकडून ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा : 13 जुलैला दसरा चौकात या…अन्यथा तुमचा कार्यक्रम ओके होईल









