Ratnagiri : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपतर्फे तात्काळ आक्षेप घेत विविध ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा भाजपाच्या वतीने जयस्तंभ येथे निदर्शने करण्यात आली.
छत्रपती संभाजी महाराजांचा हिंदू धर्मामध्ये जन्म झाला व त्याच हिंदू धर्माचा प्रसार अटकेपार पाठवावा, म्हणून ज्यांनी राज्य केले. त्या संभाजी महाराजांचा अत्यंत निर्घृणपणे वध केला. वध करण्यापूर्वी संभाजी महाराजांना सांगण्यात आले की तुम्ही हिंदू धर्माचा त्याग करा आणि मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून अतोनात हाल केले. धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी तीव्र यातना सहन केल्या. मात्र त्यांनी धर्म परिवर्तन केले नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतात. मातृभूमीचे रक्षण केले म्हणून त्यांना स्वराज्यरक्षक असेही म्हटले जाते. परंतु अजित पवारांनी महाराजांबद्दल चुकीचे व हिंदुंच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले.
या वक्तव्याचा निषेध म्हणून अजित पवार हाय हाय…अजित पवारांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन,जिल्हासरचिटणीस सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष मून्ना चंवडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर, शहर सरचिटणीस संदिप ऊर्फ बाबू सुर्वे,तालूकासरचिटणिस उमेश कुलकर्णी ,माजी नगरसेवक राजू तोडणकर, मानसी करमरकर, संपदा तळेकर, सरपंच श्रीकांत मांडवकर, राजन फाळके, राजीव कीर, संतोष बोरकर, शैलैश बेर्डे, सायली बेर्डे, भाजपाचे लोकप्रतिनिधी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष, पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, सर्व आघाड्या, मोर्चे सर्व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
Previous Articleशिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळेल
Next Article राणादा आणि पाठक बाई देवदर्शनासाठी ओटवणेत









