खेड / पतिनिधी
शहरातील डाकबंगला व मदिना चौक येथे एकास मारहाण केल्यापकरणी 5 जणांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत इब्राहिम मुरादअली लाडघरकर (24, रा. भोस्ते-जसनाईक मोहल्ला) यांनी पोलीस स्थानकात तकार दाखल केली आहे.
इमाद कोंडविलकर, सैफचौगुले (18), मुंतशीर उर्प बबलू कोंडविलकर (35), मुझम्मील कोंडविलकर (30), रियान परकार (18, सर्व रा. डाकबंगला, खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील दोघेजण मजाक मस्ती करत असल्या गैरसमज करून फिर्यादीस धमकी दिली. यानंतर एकाने मान घट्ट पकडून त्यांना हाताया डाव्या बाजूला मारले. दाकीवरून घरी जात असतानाही वॅगनार कारमधून आलेल्या 5 जणांनी मारहाण केल्यो तकारीत नमूद केले आहे.









