केदारनाथ मंदिरातील घटना, निषेधार्थ सावर्डे बाजारपेठ बंद, एकजण ताब्यात
चिपळूण प्रतिनिधी
ग्रामदैवत असलेल्या सावर्डे येथील केदारनाथ मंदिरातील मूर्तींची विटंबना करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून झाल्याचे शुकवारी उघडकीस आले. या घटनेच्या निषेधार्थ तत्काळ सावर्डे बाजारपेठ बंद करण्यात आली. घटनास्थळी कोणताही अनुचित पकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, या पकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
यावेळी संतप्त ग्रामस्थांनी विटंबना करणाऱया व्यक्तीचा शोध घेऊन त्यास तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली. या घटनेची दखल घेत पोलिसांनी तपास यंत्रणा गतीमान केली असून रत्नागिरीहून ठसेतज्ञ तसेच श्वानपथकासही पाचारण करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. या घटनेपकरणी पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.