एकजण अटकेत, फरारिंचा शोध सुरू
खेड प्रतिनिधी
खेड तालुक्यातील सात्विनगाव येथे 2 वनकर्माऱ्यांवर हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील प्रदीप पांडुरंग फावरे (रा. दाभिळ-माळवाडी) याला अटक करण्यात आली आहे, तर अन्य हल्लेखोर फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा >>>> देवरूखात 6 बंद बंगले चोरट्यांनी फोडले; 93 हजाराचा ऐवज लंपास
तळे येथील वनरक्षक परमेश्वर डोईफोडे यांना जमावाने बेदम मारहाण केल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. काडवली वनरक्षक अशोक अजिनाथ ढाकणे यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नीलेश फावरे, अरविंद फावरे, धेंडू बैकर यांच्यासह 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील हल्लेखोर फरार झाले आहेत.









